AIR News Pune Profile Banner
AIR News Pune Profile
AIR News Pune

@airnews_pune

5,531
Followers
101
Following
93,307
Media
100,747
Statuses

आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे. सविस्तर बातम्यांसाठी- YouTube -

Pune, India
Joined February 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@airnews_pune
AIR News Pune
1 month
आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 1 मे 1975 रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन पहिल्यांदा प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित झालं. #आकाशवाणीपुणे #वृत्तविभाग
Tweet media one
1
0
4
@airnews_pune
AIR News Pune
6 years
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित #मिशन_साहसी प्रशिक्षण उपक्रमास मुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित. सुमारे हजाराहून अधिक मुलींनी मिशन साहसीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाची थरारक प्रात्यक्षिके केली सादर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
52
129
@airnews_pune
AIR News Pune
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटनेचे (मार्ड) अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांना महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी ४ हजार सकस पोषक प्रथिनयुक्त खाद्य पदार्थांचे पॅकेट देण्यात आले. #CovidWarriors
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
17
127
@airnews_pune
AIR News Pune
5 years
8 डिसेंबर #दिनविशेष #बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांची आज जयंती आहे. त्यांच्याच काळात आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना 1740 रोजी #छत्रपती_शाहू_महाराजांनी #पेशवाईची_वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली.
Tweet media one
1
28
105
@airnews_pune
AIR News Pune
3 years
माझ्यासाठी आणि सगळया भारतीयांसाठी रायगडचा हा किल्ला म्हणजे एक पवित्र तीर्थक्षेत्रच आहे- राष्ट्रपती राम नाथ कोविंद. राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्याची काही क्षणचित्रे...
0
28
103
@airnews_pune
AIR News Pune
3 years
सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने मराठीसह 14 भाषांमध्ये विनामूल्य #ई_न्यायालय सेवा उपलब्ध करून देणारं मोबाइल अॅपसाठी माहिती पुस्तिका जारी केली. या ऍपमध्ये नागरिकांना आपल्या खटल्याचा तपशिल, FRI क्रमांक, वकिलांचा तपशील, खटल्याची स्थिती यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Tweet media one
2
34
107
@airnews_pune
AIR News Pune
6 years
लोअर परेल, खाररोड, गोरेगाव, मीरारोड, विरार, घाटकोपर, डोंबिवली,नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, डोंबिवली, भांडुप, वडाळा रोड, सायन, जीटीबी नगर, चेंबूर, शहाड आदी @WesternRly @Central_Railway वरील विविध रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचीही मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केली विनंती
Tweet media one
12
29
103
@airnews_pune
AIR News Pune
4 years
टाळेबंदीमुळे कॉलेज बंद झाल्यानं गावी आलेल्या स्वप्नालीचे थोड्या दिवसांनी तिचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले. पण दुर्गम भागात असलेल्या तिच्या घरात मोबाईलची रेंजच नसल्यानं उंच डोंगरावर तिच्या भावांनी त्याजागी तिला एक झोपडं बांधून दिलं. या झोपडीत स्वप्नाली ऑनलाईन शिकतेय.
Tweet media one
Tweet media two
5
25
90
@airnews_pune
AIR News Pune
3 years
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भा.ज.पा.च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि #पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजपाने अलका टॉकीज चौकात आज आंदोलन केलं
Tweet media one
Tweet media two
1
16
85
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#मुंबई 'व्हॅलेन्टाईन्स डे'चं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनिता पाध्ये यांच्या 'प्यार जिंदगी है' पुस्तकाचं प्रकाशन आज शिवतीर्थ या निवासस्थानी अनौपचारिक पद्धतीनं करण्यात आलं.
Tweet media one
Tweet media two
1
13
86
@airnews_pune
AIR News Pune
5 years
#rain पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ताम्हिणी घाट परिसरात यंदा 1 जुन ते 14 सप्टेंबर या कालावधीत 8 हजार 912 मिमी एवढा विक्रमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे.देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजी इथल्या सरासरी साडेसहा हजार मिमी पावसालाही ताम्हिणीनं मागे टाकलं आहे
Tweet media one
Tweet media two
0
18
73
@airnews_pune
AIR News Pune
4 years
प्रशासनानं सील केलेल्या मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि माहीममधील गृहनिर्माण संस्थांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार नीतीन सरदेसाई यांच्या माध्यमातून १० ते १२ हजार किलो अन्नधान्यांचे वाटप करण्यात आलं. #ContainmentZones
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
15
75
@airnews_pune
AIR News Pune
5 years
लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही याबाबत राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मनात शंका आहे, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना भाजपामध्ये पाठवले मात्र स्वतः भाजपात पक्ष प्रवेश केला नाही - नवाब मलिक @nawabmalikncp
Tweet media one
0
13
70
@airnews_pune
AIR News Pune
3 years
आज हैदराबाद मुक्तीदिन आज मराठवाड्यात साजरा करण्यात येत आहे..भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभर हैदराबाद संस्थान निझामाच्या अधिपत्याखाली होतं. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलिन झालं आणि मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला. #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन
Tweet media one
0
18
63
@airnews_pune
AIR News Pune
7 years
वर्सोवा बीचवर अफरोज शाह @AfrozShah1 व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस @Dev_Fadnavis यांचा सहभाग. समुद्र आणि किनाऱ्याच्या सर्वांगीण स्वच्छता- संवर्धनासंदर्भात शासन लवकरच धोरण निश्चित करणार- मुख्यमंत्री
Tweet media one
3
26
47
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#LokSabha बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलून मुंबई हायकोर्ट करावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली.
Tweet media one
Tweet media two
5
15
57
@airnews_pune
AIR News Pune
2 years
पुणे महापालिकेच्या हद्दीत 15 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ महापौर @mohol_murlidhar मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. या वयोगटातील मुलामुलींचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
Tweet media one
Tweet media two
0
4
57
@airnews_pune
AIR News Pune
6 years
अमराठी भाषिक लोकांकरिता राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांनी मराठी भाषा अध्ययन पद्धत हा प्रकल्प संयुक्तरित्या हाती घेतला आहे. जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकण्यासाठीचे परिपूर्ण साधन आजघडीला यामुळे निर्माण होण्यास मदत होणार आहे.
Tweet media one
1
25
59
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#अहमदनगर जिल्ह्यातील #राहीबाईपोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी काल राष्ट्रपती #रामनाथकोविंद यांच्या हस्ते #पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती पोपेरे यांनी आज अशा शब्दात भावना व्यक्त केल्या
0
15
58
@airnews_pune
AIR News Pune
2 years
दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन #PradipBhide #दूरदर्शन #Doordarshan
Tweet media one
7
8
55
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#पुणे भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार ’हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार डॉ. सुरज एंगडे यांना.तर ‘प्राचार्या नलिनीताई वैद्य समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार वैशाली पुंडलिकराव अंजली गेडाम यांना देण्यात येणार आहे.
Tweet media one
Tweet media two
2
8
56
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#नागपूर रेल्वेस्थानकावर नागपूर ते बिलासपूर #वंदे_भारत एक्सप्रेसला #पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
0
6
56
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#परभणी सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पातून पाटबंधारे खात्याने आज सकाळपासून दुधना नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू केला आहे. या पाण्याने दुधना नदी दुथडी भरून वाहत असून मोरेगाव नजीक जुन्या पुलावरून दुधना नदीचे पाणी वाहत आहे.
Tweet media one
0
6
51
@airnews_pune
AIR News Pune
2 years
1999 साली आजच्य दिवशी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. #दिनविशेष
Tweet media one
0
7
51
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#रायगड उरणला थेट सीएसटी जोडणारया बहुप्रतीक्षित नेरूळ - उरण रेल्वेची आज चाचणी घेण्यात आली.आज पहिली रेल्वे उरणला पोहोचली.उरणकरांनी रेल्वेचं जोरदार स्वागत केलं नियमित सेवा लवकरच सुरू होणार आहे.
Tweet media one
0
10
49
@airnews_pune
AIR News Pune
4 years
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे शौर्य पुरस्कार नायब सुभेदार सोमबीर सिंह आणि विज्ञान पुरस्कार डीआरड���ओचे डॉ. गुरुप्रसाद यांना जाहीर. #VeerSawarkar
Tweet media one
2
17
47
@airnews_pune
AIR News Pune
7 years
#गोवा शिपयार्डने बांधलेली #शौर्य ही गस्ती नौका केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान @dpradhanbjp यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलात दाखल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
47
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#यवतमाळ अमृतपाणीपुरवठा योजनेसाठी खोदून ठेवलेले खड्डे जीवघेणे ठरत असल्याने आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याने हे खड्डे ताबडतोब बुजवावे या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरून प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केल.
Tweet media one
0
7
48
@airnews_pune
AIR News Pune
2 years
राज्यात 14 ते 28 जानेवारी दरम्यान #मराठीभाषासंवर्धनपंधरवडा साजरा होईल. याअंतर्गत व्याख्याने, कवी संमेलन, परिसंवाद, चर्चासत्र या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच #साहित्यअकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी संवाद आदी कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आयोजित केले जातील.
Tweet media one
1
23
48
@airnews_pune
AIR News Pune
2 years
स्काय डायव्हिंग मधील आंतरराष्ट्रीय परशुट जम्पर #शीतल_महाजन हीने आज #प्रजासत्ताकदिनी नऊवारी साधी नेसून अनोख्या पद्धतीने 6 हजार फूट उंच उड्डाण करून तिरंगा ध्वजला #मानवंदना दिली. #हडपसर मधल्या #ग्लायडिंग सेंटर मध्ये काळजाचा ठोका चुकवणारे हे उड्डाण दीड मिनिटं पर्यंत चालले.
0
9
48
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#मुंबई : चारकोप मेट्रो डेपोसाठी नवीन रोड-रेल शंटर लोको आणि मूव्हरचे आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी उद्घघाटन केलं. इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल साधने ही नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन करतील.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
48
@airnews_pune
AIR News Pune
3 years
विशाखपट्टणमहून ऑक्सिजनचे 7 कंटेनर घेऊन निघालेली रेल्वे, थोड्याच वेळात #नाशिक जवळील देवळाली स्थानकात दाखल होईल, तिथे 2 टँकर उतरवून पुढे गाडी मुंबईकडे रवाना होणार आहे. #OxygenExpress
Tweet media one
0
12
46
@airnews_pune
AIR News Pune
10 months
राज्यात #ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारला जाईल. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप ४७५ कोटी तर, #एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ९०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Tweet media one
1
5
48
@airnews_pune
AIR News Pune
7 years
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकरा दिवस चालणार्‍या #हल्लाबोल आंदोलनाल पायी मोर्चाला काल यवतमाळ येथुन सुरुवात झाली. सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी आंदोलनाच्या जाहीर सभेत सांगितलं.
Tweet media one
3
11
44
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#गगनयान मिशन साठी चार भारतीय अंतराळ वीरांचं रशियात युरी गागारिन अंतराळ केंद्रात सुरू असलेलं प्रशिक्षण कोविड 19 च्या साथीमुळे थांबलं होतं ते पुन्हा सुरू झालं आहे. त्याना सध्या अंतराळयान नियंत्रणाचे प्राथमिक धडे दिले जात असल्याचं ट्वीट रशियन स्पेस कार्पोरेशननं काल केले. #Gaganyaan
Tweet media one
2
11
44
@airnews_pune
AIR News Pune
5 years
11 ऑक्टोबर 1968 #दिनविशेष ग्रामगीतेतून आत्मसंयमाचे विचार मांडणारे राष्ट्रसंत #तुकडोजीमहाराज यांचा स्मृतिदिन. विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. कुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्था व राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर अवलंबून असते हे त्यांनी कीर्तनातून सांगितले.
Tweet media one
1
9
43
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#पुणे जिल्ह्यातील राजगडावर लवकरच #रोपवे ची सुविधा उपलब्ध होणार. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कंपनीकडून राजगडासह राज्यातील #माथेरान आणि नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरी पर्वतांमधील #अंजनेरी इथं रोप वेची उभारणी केली जाणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
41
@airnews_pune
AIR News Pune
2 years
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावर आज चंपाषष्टी निमित्तानं मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती . भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषाने अवघी जेजुरी नगरी दुमदुमून गेली.
Tweet media one
2
11
41
@airnews_pune
AIR News Pune
4 years
ऑनलाईन लेक्चरसाठी नेटवर्क मिळावं म्हणून घरापासून दोन किलोमीटरवर डोंगरात झोपडी बांधून अभ्यास करणाऱ्या #सिंधुदुर्ग मधील स्वप्नाली सुतारला मुंबईत होस्टेलसाठी भरावे लागणारे पैसे नाहीत हि अडचण होती. त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी तिच्या घरच्यांशी बोलून तिला ५० हजार रुपये मदत केली आहे
Tweet media one
Tweet media two
5
13
43
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#CoronaInMaharashtra कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, अशा परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा देण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना. @rajeshtope11 #FacebookLive
Tweet media one
0
8
41
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#RajyaSabha मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात केली.
Tweet media one
Tweet media two
2
7
41
@airnews_pune
AIR News Pune
1 year
वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत #दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली असून दर्शनासाठी भाविकांच्यामोठ्या रांगा लागल्या आहेत.#अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.#आकाशवाणीपुणे
Tweet media one
2
4
41
@airnews_pune
AIR News Pune
1 year
उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी.. #summer
Tweet media one
1
11
40
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#सांगली- मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायाने आता कात टाकली असून, युवा तंतूवाद्य कारागिरांनी तंतुवाद्य निर्मितीत नवनवे प्रयोग केलेत. पूर्वी पारंपारिक रंगात उपलब्ध असणारी तंतूवाद्ये आता आकर्षक विविध रंगात उपलब्ध होत आहेत.नईम सतारमेकर यांनी नुकतीच मयुरपंखी रंगातील आकर्षक सतार बनविली आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
9
41
@airnews_pune
AIR News Pune
4 years
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मेट्रो २ ए दहिसर ते डी एन नगरच्या काम सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया उभारण्याचे अत्यंत कठीण टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पार केला आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
39
@airnews_pune
AIR News Pune
2 years
मॉरीशसच्या मोका इथल्या महात्मा गांधी इन्स्टिटयूट परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयाचं अनावरण करण्यात आलं. @RamdasAthawale
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
8
38
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#रायगड : लॉकडाऊनमुळे माणसांच्या जगण्याची परवड सुरू आहे तिथं मुक्या प्राण्याचं काय? ही अडचण लक्षात घेऊन रोहयातील कुमार देशपांडे यांनी गावातील भटक्या कुत्र्यांसाठी अन्नछत्रच सुरू केलं आहे.. देशपांडे आणि त्यांची कन्या दररोज गावातील कुत्र्यांना अन्न देत आहेत.. #Lockdown21
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
10
39
@airnews_pune
AIR News Pune
1 year
गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या महाराष्ट्रातल्या 3 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा शौर्यचक्र पुरस्कारानं गौरव. #gallantryaward #Maharashtra #gadchiroli
0
9
37
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासची तिकिटे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही तासांतच विकली गेली.एक्झिक्युटिव्ह क्लासला(EC) प्रवाशांनी प्रथम पसंती दर्शवली आहे. #आकाशवाणीपुणे
Tweet media one
0
7
37
@airnews_pune
AIR News Pune
6 years
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या समन्वयकांशी आमचा संबंध नाही,नऊ ऑगस्टपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर राज्यभर राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करण्यात येईल - मराठा क्रांती मोर्चाच्या लातूर इथं झालेल्या राज्यस्तरीय समन्वयक बैठकीचा इशारा. #मराठा_आरक्षण
Tweet media one
0
11
31
@airnews_pune
AIR News Pune
1 year
नववर्षाच्या स्वागतादरम्यान #पुणे परिसरातील किल्ल्यांवर साजऱ्या होऊन या गड किल्ल्यांचं पावित्र्य नष्ट होऊ नये यादृष्टीनं वन विभागानं काही निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार शहर आणि परिसरातील गड आणि किल्ल्यांवर आज सायंकाळी 6 नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. #NewYear
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
32
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#पुणे- भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. या वाड्याची दुरवस्था झाली आहे, या वास्तूचं जतन करून राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली असून यासाठी ते भिडे वाडयाबाहेर उपोषणाला बसलेत.
Tweet media one
3
3
34
@airnews_pune
AIR News Pune
3 years
24 एप्रिल #दिनविशेष भारतीय क्रिकेटपटू #सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस.सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी तो सन्मानित केल आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
0
2
33
@airnews_pune
AIR News Pune
3 years
मराठाआरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रसरकार आणि राज्यसरकार एकमेकांवर टोलवाटोलवी करतआहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे अध्यक्ष राजठाकरे यांनी आज पुण्यात केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन राजठाकरे यांच्या हस्तेझालं त्यावेळी ते बोलत होते. #Reservation
Tweet media one
0
3
33
@airnews_pune
AIR News Pune
4 years
6. करदात्यांची सनद प्रकाशित! करदाता सेवेत सुधारणा करण्याची आणि स्वतःला उत्तरदायी बनवण्याची प्राप्तिकर विभागाची वचनबद्धता यातून ठळकपणे दिसते, या सनदीमध्ये करदात्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या यांचे सुस्पष्ट वर्णन; करदात्यांकडून असलेल्या अपेक्षांचेही विवरण यात आहे. #HonoringTheHonest
Tweet media one
0
7
31
@airnews_pune
AIR News Pune
4 years
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दुसऱ्या टप्प्यातील कोविड १९ रुग्णालयाच्या कामाला सुरवात #WarAgainstVirus
Tweet media one
Tweet media two
2
4
31
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#मुंबई : माथेरान हे नेहमीच पर्यटक आणि नागरिकांसाठी विरंगुळ्याचे स्थान. एमएमआरडीएने येथील सुशोभीकरणाचे काम हाती घेतलं. येथील पॅनोरमा पॉईंट,हार्ट पॉईंट,मियरा पॉईंट आणि इको पॉइंट या 4 महत्वाच्या ठिकाणचे काम प्रगतीपथावर असून या कामाचा एमएमआरडीए आयुक्त आर.ए. राजीव यांनी घेतला आढावा !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
33
@airnews_pune
AIR News Pune
4 years
पुण्यातील डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या संस्थेनं रुग्णाच्या छातीच्या क्ष किरण चाचणीद्वारे त्याला कोविड १९ आजार आहे की नाही हे ओळखण्याचं तंत्र विकसित केलं आहे. हे तंत्र वापरण्याची इच्छा असलेल्या सगळ्यांना ते मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय संस्थेनं घेतला आहे.
Tweet media one
2
20
31
@airnews_pune
AIR News Pune
6 years
लोकसहभागातून १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण. आज दुपारपर्यंत १४ कोटी ७१ लाख ८८ हजार ४१७ वृक्षांची लागवड. महसूलमंत्री @ChDadaPatil ,वनमंत्री @SMungantiwar , मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, सचिव विकास खारगे आदींच्या उपस्थितीत मंत्रालयाशेजारील उद्यानात वृक्षारोपण करून मोहिमेचा समारोप
Tweet media one
1
9
28
@airnews_pune
AIR News Pune
4 years
देशातील 8 समुद्र किनार्‍यांची प्रतिष्ठेच्या,ब्लू फ्लॅग या आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय मानकासाठी शिफारस, यासाठी शिवराजपूर-गुजरात, घोघला-दमण-दिव,कासारकोड,पुडबिद्री- कार्नाटक,कप्पाड- केरळ,रुशिकोंडा-आंध्र प्रदेश,गोल्डन-ओडिशा,आणि राधानगर-अंदमान निकोबार बेट या समुद्र किनार्‍यांची निवड
Tweet media one
Tweet media two
0
8
32
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#अहमदनगर जिल्ह्यातील सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पावसापेक्षा 170.7 टक्के जास्त पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी नेवासे राहुरी या भागांमध्ये पावसाने थैमान घातले असून त्यामुळे अनेक पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.
Tweet media one
Tweet media two
1
3
32
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#दिनविशेष 1 जानेवारी 1880 #आजच्यादिवशी विष्णुशास्त्री चिपळूणकर,गो ग आगरकर , लोकमान्य टिळक यांनी माधवराव नामजोशी यांनी #न्यू_इंग्लिश_स्कूल_पुणे या शाळेची स्थापना केली होती .
Tweet media one
Tweet media two
1
3
31
@airnews_pune
AIR News Pune
4 years
अमन खान सातवीत शिकतो.आई वडील विजापूरला.आजी आजोबांजवळ पुण्यात सध्या स्वारगेट च्या उड्डाणपुलाखाली राहतो. टाळेबंदीमुळे आजोबांना काम नाही. स्वारगेट पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोज जेवण देत. आज पोलीस नाईक गुरव आणि हवालदार शिंदे यांनी अमान ला नवीन कपडे भेट दिले आणि त्याची ईद साजरी केली.
Tweet media one
4
5
30
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यात आरवली-सोन्सुरे येथील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाळू शिल्पाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. #बाबासाहेब_पुरंदरे
Tweet media one
0
6
31
@airnews_pune
AIR News Pune
7 years
#आषाढी_वारीसाठी संत श्री #तुकाराम_महाराज पालखी सोहळा आज देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार; राज्यभरातून अनेक #वारकरी देहूत दाखल
Tweet media one
Tweet media two
1
20
29
@airnews_pune
AIR News Pune
3 years
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रश्न मंजुषा, आजचा प्रश्न!! (कॉमेंट मध्ये उत्तर द्या. प्रथम अचूक उत्तर देणाऱ्याला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी) #AzadiKaAmritMahotsav #indiaIndependenceday #IndependenceDayIndia2021 #Azadi #azadimubarak
Tweet media one
22
9
31
@airnews_pune
AIR News Pune
5 years
27 फेब्रुवारी 1931 #दिनविशेष थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा स्मृतीदिन.
Tweet media one
0
6
26
@airnews_pune
AIR News Pune
4 years
एमएमआरडीएने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जंक्शन स्थानकातील अखेरच्या पाईल कॅपचे काम पूर्ण केलं आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण करून एमएमआरडीएने महत्त्वपूर्ण ध्येय साध्य केलं आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
30
@airnews_pune
AIR News Pune
4 years
चक्रीवादळानंतरही वांद्रे- कुर्ला संकुलातील कोविड -१९ रुग्णालय खंबीरपणे उभे ! बाहेरचे दोन चार पत्रे निखळण्या व्यतिरिक्त नुकसान राहील. ताशी 80 किलोमीटर वेगाच्या वार्‍याचा या रुग्ंणालयानं सामना केला. आता पावसाळ्यात चिंता नाही - प्रशासनाचं मत. #WarAgainstVirus
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
7
30
@airnews_pune
AIR News Pune
7 years
राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडीचा आपण अंदाज घेत असून त्यावर 21 सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या सभेत भाष्य करणार - राज ठाकरे #मनसे पुण्यात
Tweet media one
0
9
27
@airnews_pune
AIR News Pune
6 years
पालघर जिल्ह्यातल्या टेंभी - खोडावे इथलं मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन सर्वेक्षणाचं सुरू असलेलं काम काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बंद पा��लं. मनसे कार्यकर्त्यांनी मोजणीचं समान फेकून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Tweet media one
0
6
30
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#पुणे- मावळ, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील मिळून सुमारे 25 एकर शेतात यंदा प्रायोगिक तत्वावर काळ्या आणि निळ्या रंगाच्या भाताची लागवड करण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार औषधी गुणधर्म असलेल्या या तांदळाला प्र.कि. 200 ते 400 रुपये दर मिळतो
Tweet media one
Tweet media two
2
6
30
@airnews_pune
AIR News Pune
3 years
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज #आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिराला फुलं आणि तुळशीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळपासूनच भाविकांची अलंकापुरीत रांग लागली होती. #कोजागिरी_पौर्णिमा
Tweet media one
0
2
28
@airnews_pune
AIR News Pune
5 years
पुण्यात मुख्य टपाल कार्यालयाजवळ ब्रिटीशकाळापासून झिरो माईलस्टोन अर्थात शून्य मैलदगड आहे. नुकतच याचं नुतनीकरण करण्यात आलं. पुणे रेल्वे स्थानक परिसरात मुख्य टपाल कार्यालयाजवळ 1872-73 मध्ये ब्रिटिश राजवटीत हा शून्य मैलाचा दगड बसवण्यात आला होता. #milestones
Tweet media one
0
8
29
@airnews_pune
AIR News Pune
3 years
सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 40 किमी रस्त्याच्या कामाचा विक्रम करण्यात आला. बांधकाम विभागाच्या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
29
@airnews_pune
AIR News Pune
7 years
सोलापूर जिल्ह्यातील #उजनी धरण शंभर टक्के भरलं. धरणातून सुमारे २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
Tweet media one
0
10
26
@airnews_pune
AIR News Pune
5 years
तुळजापूरच्या तुळजाभवानीसाठीचा पलंग अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबलक येथून पाठवण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. काल या पलंगाचं प्रस्थान झालं असून, अहमदनगर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढून हा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ झाला. #Navaratri2019
Tweet media one
0
3
29
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#दिनविशेष 2 ऑगस्ट 1979 अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्‍नी मेबेल आरोळे यांना #मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला इ.स. १९७० साली त्यांच्या पत्नी मेबेल आरोळे यांच्या सहकार्यानं जामखेडच्या ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प सुरू केला.
Tweet media one
0
2
27
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#पुणे शहरातकोणत्याही अधिकृतपरमिट शिवाय रिक्षाव्यवसाय करीतअसल्याचा संशय पुणेप्रादेशिकपरिवहनविभागानं व्यक्त केल्यावरपोलिसांकडून हीतपासणी सुरुकरण्यात आलीआत्तापर्यंत सुमारे 6हजाराहून अधिकरिक्षाचालकांविरुद्ध विविधकलमांखाली कारवाई करण्यात आली - उपप्रादेशिकपरिवहन अधिकारीसंजीव भोर
Tweet media one
2
9
29
@airnews_pune
AIR News Pune
1 year
पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरील काही पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे प्रशासनानं सुधारणा केल्या असून, त्यामुळं पुढील आठवड्यापासून आणखी काही उपनगरी गाड्या शिवाजीनगर रेल्वेस्थानकातूनच सुटण्याची शक्यता आहे.
Tweet media one
2
4
27
@airnews_pune
AIR News Pune
4 years
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणूपासून जनतेने सुरक्षित राहावं यासाठी कालपासून जनजागृती अभियान सुरू केलं आहे. या विषयी #नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे.
0
9
27
@airnews_pune
AIR News Pune
3 years
पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेता #प्रमोद_भगत आणि कास्यपदक विजेता #मनोज_सरकार यांच्या खेळाच्या शानदार प्रदर्शनाने ऑलिम्पिक मध्ये भारताला उच्च स्थान प्राप्त करून दिले
0
8
26
@airnews_pune
AIR News Pune
1 year
#पुणे स्टेशन जवळील #GPO इथं आता सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी दुपारी 3 वाजेपर्यंत पार्सल सेवा होती. आता आणखीन 5 तास वाढवल्यामुळे अधिकाधिक नागरिकांना पार्सल पाठवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे,- #GPO डेप्युटी पोस्टमास्तर एन.एस.बनकर
Tweet media one
1
7
27
@airnews_pune
AIR News Pune
3 years
अलीकडेच राज्य शासनाने मोहफुलांवरील बंदी उठविल्यानंतर #मोहफुले संकलनामधून मिळणारा रोजगार आणि होणाऱ्या अर्थकारणावर चर्चा होऊ लागली आहे. मात्र,या व्यवसायाला राजाश्रय देण्यासाठी मोहफुलांचे मूल्यवर्धन होणे आवश्यक झाले आहे.मूल्यवर्धनातून #अर्थकारण १ हजार कोटींपेक्षा जास्त होऊ शकतो.
Tweet media one
0
3
26
@airnews_pune
AIR News Pune
2 years
पुण्याच्या #लोहगांव विमानतळावरून अबुधाबी, बँकॉंक, मलेशिया, सिंगापूर या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाद्वारे विमान कंपन्यांना पाठविण्यात आला आहे. #flights #Pune #Airport
Tweet media one
0
3
26
@airnews_pune
AIR News Pune
5 years
#विठ्ठल_रुक्मिणी #कार्तिकी_एकादशी निमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील @ChDadaPatil यांनी आज #पंढरपूर येथे सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी #सांगली जिल्ह्यातील बेडगचे मानाचे वारकरी सुनील व नंदा ओमासे या शेतकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
27
@airnews_pune
AIR News Pune
2 years
देशाला #मराठीभाषा आणि साहित्याचा अभिमान आहे.या भाषेला #अभिजातभाषा चा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी #राज्यसभा मधील प्रश्नोत्तरावेळी दिली
Tweet media one
1
12
27
@airnews_pune
AIR News Pune
5 years
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी @BSKoshyari , विधानसभा अध्यक्ष नाना पटोले @NANA_PATOLE , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप. महापरिनिर्वाणदिनी आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी दिली भेट.
Tweet media one
Tweet media two
0
1
25
@airnews_pune
AIR News Pune
4 years
वांद्रे कुर्ला संकुल आणि ठाण्यातील कोविड १९ रुग्णालयांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण. #WarAgainstVirus
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
6
25
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#माझी_मराठी_माझा_अभिमान राज्यात केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थांमध्ये त्रि भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Tweet media one
2
4
23
@airnews_pune
AIR News Pune
4 years
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताफ्यात पहिले रेल रोड मूव्हर मशीन दाखल झालं आहे. #मेट्रो गाड्यांच्या शँटिंगसाठी ही मशीन वापरण्यात येणार आहे. ही मशीन रेल्वे रूळ आणि रस्त्यावर चालविता येणार आहे. #MMRDA
Tweet media one
0
7
26
@airnews_pune
AIR News Pune
4 years
12 जून - #दिनविशेष महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक 'पु.ल.' अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा आज स्मृतीदिन. #पुलंस्मृती #पुलदेशपांडे
Tweet media one
1
5
25
@airnews_pune
AIR News Pune
3 years
स्वारगेट आगारातून २० डिसेंबरपासून दर रविवारी स्वारगेट-रायगड दर्शन या मार्गावर निमआराम बस सुरू करण्यात येत आहे. स्वारगेट येथून सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ही बस सुटेल; तर रायगड दर्शन करून ही बस सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत स्वारगेटला पोहोचेल.
Tweet media one
0
6
25
@airnews_pune
AIR News Pune
5 years
तिलारी धरण #सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात तिलारी नदीवर वीजनिर्मिती करण्यासाठी #महाराष्ट्र शासनाने तिलारी प्��कल्प साकारला. धामणे गावा शेजारी दाट जंगलात बांधण्यात आलेले हे दगडी धरण वास्तुशास्त्राचा अद्‌भुत नमुना आहे.हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. #VisitMaharashtra
Tweet media one
0
5
25
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कामांसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक ‘स्टार्डल कॅरिअर’चा वापर करण्यात आला आहे. गर्डर बसवण्यासाठी ‘स्टार्डल कॅरिअर’चा वापर केल्यानं वाहतुकीला अडथळा न होता काम सुलभ आणि जलद.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
4
25
@airnews_pune
AIR News Pune
3 years
#दिनविशेष स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि फलंदाज के. एस. रणजीतसिंह यांचा जन्मदिवस. (वर्ष- १८७२.) इंग्लंडच्या संघाकडून कसोटी क्रिकेट खेळत असत. त्यांच्या स्मरणार्थ १९३४पासून रणजी क्रिकेट करंडक स्पर्धा घेतल्या जातात.
Tweet media one
0
3
23
@airnews_pune
AIR News Pune
4 years
14 ऑक्टोबर: #दिनविशेष भारतरत्न डॉ.#बाबासाहेबआंबेडकर यांनी आजच्याच दिवशी सन 1956 मध्ये लाखो अनुयायांसह #नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
5
24
@airnews_pune
AIR News Pune
4 years
#सिंधुदुर्ग जिह्यातले सर्व किल्ले एकाच ठिकाणी पाहण्याची संधी सर्वाना उपलब्ध झालीय. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने सावंतवाडी तालुक्यात मळगाव इथं गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. त्याला किल्लाप्रेमी नागिरकांचा फार चांगला प्रतिसाद मिळतोय.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
25
@airnews_pune
AIR News Pune
2 years
राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ही समिती राजभाषा मराठीचं धोरण ठरविण्याचं काम आहे. #म #मराठीभाषा
Tweet media one
Tweet media two
0
10
25
@airnews_pune
AIR News Pune
4 years
आज ७ नोव्हेंबर. १८७५ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी #वंदेमातरम हे गीत लिहिले. भारतीय संविधानानुसार या गीताला #राष्ट्रीयगीत म्हणून दर्जा देण्यात आला आहे. या गीताला रवींद्रनाथ टागोर यांनी संगीत दिले आहे.
Tweet media one
Tweet media two
0
4
24