Prafulla Wankhede 🇮🇳 Profile Banner
Prafulla Wankhede 🇮🇳 Profile
Prafulla Wankhede 🇮🇳

@wankhedeprafull

64,430
Followers
1,386
Following
994
Media
17,570
Statuses

Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG

Mumbai, India
Joined March 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
7 years
Feeling good that #LPG is now Happy Fuel for many Industries & Houses.Transformation from Fear Fuel to Happy Fuel is my life journey too. 😊😊
Tweet media one
31
78
1K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आपल्या महाराष्ट्राची ही लेक ऐश्वर्या जाधव चक्क विम्बल्डनमधे खेळतेय. प्रचंड अभिमान आणि गर्व ✊👍
Tweet media one
32
245
4K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी ती आपल्या दुर्गुणांची. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
28
381
3K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आजही एसटीकडे १. प्रवासी आहेत. २. ड्रायव्हर,कंडक्टर,सपोर्ट स्टाफ आहे. ३. गुडविल,नेटवर्क,इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर आहे. ४. सर्वात महत्वाचं दर किफायतशीर आहेत. ५. विश्वासार्हता तर सर्वाधिक आहे. खरा प्रॅाब्लेम हा अयोग्य मॅनेजमेंट आणि त्याचे दूरदृष्टीहीन नेतृत्व करणाऱ्यांमधे आहे.
93
448
3K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
पाट्या मराठीत हे आता ठिकायं पण दुकानदार मराठी झाले तर त्या नीट टिकतील!
60
241
3K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
स्वप्न पहायला हवीत…..ती खरी होतात! लहानपणापासून आजपर्यंत नवी पुस्तकं खरेदी केली त्याच्या पानावरुन हात फिरवायला, तो फिल घ्यायला, नव्या पानंचा सुवास घ्यायला खुप आवडायचं… स्वतःच्या पुस्तकाची अशी जन्मापासूनची प्रक्रिया पाहणं अवर्णनीय आहे. आनंदाचं पान❣️
116
197
3K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
1 year
रतन टाटा होणं इतक सोप्प नक्कीच नाही, आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या काळात आपला जन्म झाला….. खूप आदर, खूप प्रेम ✊❣️
Tweet media one
34
348
3K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
एकदा वेळेचे नियोजन आणि त्याप्रमाणे कृती व्हायला सूरूवात झाली की यश आणि पैसा चुंबकासारखा येतो. जेवढ्या लवकर हे कळेल तेवढे यश मोठे.
22
273
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आजचा मुंबई-पुणे प्रवास - एकाही टोलनाक्यावर #FasTag असूनही सलग जाता आले नाही. - जाताना २ टोलनाके मिळून १० मिनीटं वेळ वाया गेला. - येताना तळेगावला तब्बल १५ मिनिटं आणि ३ लेन बदलल्या तेंव्हा स्कॅन झाले. बॅलंस असूनही मनस्ताप, गुंडगिरीची भाषा…सगळं गंडलय पण कोणाला काय पडलं नाय! 🤦‍♂️😔
128
254
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
टाटा म्हणजे भारताच्या औद्योगिक विश्वाच्या मुकुटावरील कोहिनूर हिरा!
34
128
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
1 year
कसलं भारीये हे ❣️
36
350
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण गरीबच राहतात.
44
231
3K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
6 months
काय भारी वारसा आहे आपल्या मातीचा ❤️
Tweet media one
22
303
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
श्रीमंत व्हायचं असेल तर “आर्थिक शिस्त” हवी, आणि ती ही “अगदी कडक!” त्यासाठी - १. भावनांवर नियंत्रण २. इतरांशी तुलना बंद ३. वर्षाच्या सुरूवातीलाच आर्थिक नियोजन या अगदी बेसिक गोष्टी सूरू केल्या तरी दोन-तीन वर्षातच आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारते. #आर्थिकसाक्षरता
34
331
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
मुंबई-पुण्यापलीकडचा महाराष्ट्र मला फार अस्वस्थ करतो. आरोग्यसुविधांची वानवा, रोजगाराचे प्रश्न, शेती,वीज,पाण्याची संकटं, शिक्षणाचा दर्जा, उच्चशिक्षणाच्या संधी, स्किल डेव्हलपमेंट, लोकांमधे विज्ञान-तंत्रज्ञानाऐवजी इतिहास, राजकारण,व्हॉट्सॲपमुळे वाढत असलेली नको इतकी टोकाची भूमिका 🤦‍♂️
96
268
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
पवार साहेबांना काम करताना, प्रवास करताना, बोलताना पाहिलं की वेगळीच उर्जा मिळते….. अफाट कर्तृत्व आणि अभ्यास असलेली ही अशी माणसं म्हणजे महाराष्ट्राचं खरं वैभव आ��ि अभिमान! 🙌🙏
51
179
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
फार मोटीवेशनल भाषणं, व्हिडीओ किंवा टॅाक शोजच्या आहारी जावू नये….. शेवटी आपले प्रॅाब्लेम आपल्यालाच सोडवायचे असतात.
52
166
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
जसे गरुडाला पंख आणि वाघाला नखं, तशी ही मुंबई मराठी मुलखाला! - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ✊🙏
9
281
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
मुंबईत आल्यानंतर सर्वात आपुलकीची जी काही थोडीफार माणसं वाटायची त्यात बेस्ट बसचे कंडक्टर आणि नाक्यानाक्यावरचे पोलिस…..बिनधास्त जाऊन काय हवी ती माहिती विचारायची! या मायानगरीत त्यांच्यात “आपलेपण” वाटायचं; अगदी अस्सल “आपलेपण” आजही ते तसच आहे , ते टिकायला हवं!
32
159
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आपल्याकडे बहुतांशवेळा आदर हा आर्थिक श्रीमंतीशी निगडीत असतो, आर्थिक विवंचनेत असणाऱ्या प्रचंड विद्वान माणसालाही लोकं वेडा म्हणायला कचरत नाहीत. एकवेळ गडगंज पैसा नसला तरी चालेल पण इतरांकडे हात पसरायची वेळ येऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी.
37
287
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
सतत आळस, आराम आणि निवांत रहायची सवय आपल्याला गुलाम बनवायला पुरेशी असते.
17
203
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
1 year
वाघानं माकडाच्या नादाला लागलं की वाघाचं पण माकडचं होतं….. 😉😃 Choose your battles carefully. 😁
49
302
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
बचतीची सवय असलेला माणूस म्हणजे हसण्याचा विषय आणि ऐपतीपेक्षा वारेमाप खर्च करणारा म्हणजे खरा दिलदार….. हाच सापळा आहे, पैशांचे महत्व आयुष्यात फार मोठे आहे. ते समजले की चांगल्या सवयी आपोआप लागतात.
28
237
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
कधी कोणाच्या फाटक्या खिशावर हसू नये….. कधी कोणता टर्न येईल आणि कोण कोणाला खिशात टाकेल सांगता येत नाही!
24
211
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
1 year
मिसळींच्या हॉटेल्सची फारच बोगस मिसळ होत चाललीये….. चव ना ढव, नुसता रंग आणि चित्रविचित्र नावं, बाकी सगळी बोंबाबोंब!
133
105
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
शाळेच्या वर्गात पहिला येणारा प्रत्येक विद्यार्थी भरपूर पैसे कमवून श्रीमंत होतोच असे नाही कारण पैसे कमवायला फक्त शैक्षणिक बुद्धीमत्ता,देशीविदेशी पदव्यांची प्रमाणपत्र नाही तर ▪️कंफर्ट झोन सोडण्याची तयारी ▪️धोके पत्करण्याची सवय ▪️व्यावहारिकपणा ▪️माणूसकी ▪️प्रसंगानुरूप लवचिकता लागते.
24
267
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
7 months
मराठी माणसाला घर नाकारलं जातयं यात नवं ते काय? हे डायरेक्टली-इंडीयक्टली चालत आलेलं वर्षानुवर्षाचं कटूसत्य आहे. भावनिक पोष्टी करून काही होणार नाही, कृती महत्वाची….. बुद्धीवंत, हुशार तरूण मराठी युवक मुंबईत यावा, तो इथे टिकावा म्हणून आहेत का काही योजना? करणार का त्यांच्या…
115
533
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
कोणी काहीही म्हणो जगात पैशाशिवाय काही होत नाही. तो मिळविण्याचे चांगले-वाईट दोन्ही मार्ग आहेत. वाईटाचे हजारो मार्ग पण चांगल्याचा एकच ‘ज्ञान अन प्रामाणिकपणा’ त्यासाठी ‘वाचनासारखा’ दुसरा सोपा मार्ग नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात सखोल ज्ञान मिळवा…पैसा चुंबकासारखा चिकटेल.
32
240
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
संपत्ती ✊
49
106
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
ज्यांच्या घरी वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांच वाचन होतं ती लोकं, कुटूंब भारी असतात…..त्यांच्या लहान मुलाबाळांतही त्या ज्ञानाचं तेज दिसतं! प्रत्येकाच्या घरात एक तरी पुस्तकाचं कपाट यावं. अज्ञान, भेदभाव, गरीबी, द्वेष या सर्वांना कायमच गाडून टाकायला तेवढंच पुरेसं आहे. 🙏📚
25
244
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
तरूणांनो आपली शक्ती, वेळ आणि पैसा व्यर्थ दवडू नका. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
Tweet media one
14
190
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
हे काका एवढ्या भयंकर गरमीत, भर दुपारी, उन्हातान्हात फिरून कुल्फी विकताहेत ते त्यांच्या कुटुंबाला चार घास खायला मिळावेत, पोराबाळांच शिक्षण व्हावं, अन त्यांच्या नशीबात हे कष्ट न यावं म्हणून. या कष्टाची त्यांच्या मुलाबाळांना जाणीव रहायला हवी हीच प्रार्थना!
17
192
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
कृतज्ञता, आभार, धन्यवाद, आदर, आनंद आणि इतर अनेक फॉरमॅलिटीजच्या पलिकडे अजून बरचं काही लिहायचं, प्रत्यक्ष बोलायचं बाकी आहे….. हे पुस्तक सत्यात उतरलं ते केवळ अन केवळ तुमच्या प्रेम अन मायेमुळेच❣️✊ आपल्याला मिळून खूप पुढे जायचयं, साथ असूद्या 🙏 #गोष्टपैशापाण्याची #आर्थिकसाक्षरता
Tweet media one
237
226
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
परिक्षेचा पेन 🥰😍
Tweet media one
78
45
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
9 months
कौतूक अन अभिमान ❤️✊🙏 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई.
Tweet media one
9
110
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
7 months
जो महाराष्ट्रात राहतो, इथेच कमावतो, इथलं खातो, जगतो तरीही महाराष्ट्राच्या, मराठीपणाच्या मुळावर उठतो तो कितीही पिढ्यांपासून इथे राहिला तरीही तो परप्रांतीयच!
35
374
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
अजूनही निशब्द आहे….. या अफाट प्रेम आणि मायेच्या ऋणात आयुष्य��र रहायचयं…. खूप खूप धन्यवाद ❣️🙏 #खूपप्रेम #खूपआदर #गोष्टपैशापाण्याची
Tweet media one
60
115
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
यशस्वी व्हायचे असेल तर “शिस्त” हवीच! आपल्या वागण्यात, बोलण्यात, लिहिण्यात आणि एकंदर आयुष्य जगण्यात…..!!!
19
177
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
कोणतेही लोन पुर्ण भरून झाले तरी त्या हप्यांएवढी रक्कम (EMI) पुढचे काही महिने तशीच एका वेगळ्या बॅंक अकाऊंटमधे टाकत त्याची “बचत” करायची. जमा झालेली रक्कम मुलांच्या भविष्यासाठी किंवा इतर योग्य कामी “गुंतवणुक” करावी. एक वेगळी आठवण तर राहतेच आणि चांगली सवयही लागते. #आर्थिकसाक्षरता
41
187
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
मुंबईत आल्याआल्या काय शिकलो तर, ओळखपाळख न पाहत��� जो संकटात दिसेल त्याला मदत करायची.बर ती तिथल्या तिथं विसरायची. पुढे लगेच स्वत:ला सांभाळत येणारी लोकल पकडून जीवाच्या आकांताने इच्छित स्टेशनवर उतरायचा प्रयत्न करायचा. कधी आपण अडकलो तर असाच कोणीतरी येतो, मदत करतो-पुढे जातो. #मुंबई❣️
39
207
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
बुद्धीचा आदर, गौरव हवाच, सोबत बुद्धीवंत माणसांवर अफाट प्रेम करता यायला हवं!❣️ #ज्ञानसुर्य
Tweet media one
14
192
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
1 year
निमित्त गोष्ट पैशापाण्याची….. पुस्तकं, वाचन आणि साहेब ! ✊❣️
Tweet media one
Tweet media two
64
143
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
प्रवाहासोबत जाणारे पालापाचोळ्यासारखे वाहत जातात….. विरूद्ध दिशेने जायला प्रचंड इच्छाशक्ती लागते…..जगण्याची एक वेगळीच धडपड, कोण साथसोबत करेल की नाही खात्री नसते. हवा तसा शेवट होईल की नाही याचीही हमी नसते…..फक्त लढायचं…..जीवाच्या आकांताने पण कधी “पालापाचोळा” नाही व्हायचं.…!
55
255
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
अपमान आणि अपयश पचवता येणारी माणसं फार मोठी असतात. त्यांच्याकडून शिकायचं पुन्हा उभं रहायला, लढायला.
17
192
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
1 year
ज्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात त्याला नेहमी आनंदाने “टॉप प्रायोरिटी” द्यायला हवी. त्या कामात सर्वोत्तम दर्जा दिला की - काम असो की पैसे कधीही कमी पडत नाही. #BusinessDots
21
233
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते. कर्जबाजारीपणा अन कफल्लक होणे काय? हे नको त्या वयात फार क्रूरपणे #SaturdayThread #BusinessDots #मराठी १/१२
Tweet media one
Tweet media two
101
338
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
१. बजेट आवडले तर ठिक आहे. (खरचं कळले तर) २. बजेट नाही आवडले तर पुढच्या निवडणुकीला न विसरता मतदान करा. ३. आता वरील दोन्ही गोष्टी बाजूला ठेवा आणि स्वत:च्या बजेटचे पहा. अगदी मनापासून सांगतोय या वर्षाचे स्वत:चे नीट बजेट तयार करा, अतिरिक्त खर्च टाळा, काही बचत होतेय का पहा! #नियोजन
25
168
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
कट्टरता वाढली की विकृती येते, आणि विकृती वाढली कि अंत होतो.
25
213
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
बचत वाढवायचा साधा उपाय - एक संपुर्ण वेगळं खात बॅंकेत उघडा, दर महिन्याला ठराविक रक्कम त्यात जमा करा. अधूनमधून ज्या ज्या वेळी कोणत्याही वाटाघाटीतून रक्कम वाचत जाईल ती ही त्यात ट्रान्सफर करा! कमीतकमी सहा महिने तरी त्यातून पैसे काढू नका, एकदा सवय लागली की त्याचे महत्व आपोआपच कळेल.
39
191
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
आपल्याकडे श्रीमंत म्हणजे भरपूर पैसे उडविणारा, अमाप खर्च करणारा, भारी गाड्या फिरवणारा अशीच इमेज बनलेली असते…… आणि तीच चुकीची आहे. श्रीमंत म्हणजे आलेला पैसा जपायचा कसा आणि नक्की गुंतवायचा कुठे हे बरोबर कळते….. पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणजे बौद्धिक दरिद्री; श्रीमंती नव्हे.
37
200
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
काही गणितं नव्यानं सोडवली तर चांगला फायदा होतो….. हे करून पहा! उत्पन्न - खर्च = बचत ❌ ऊत्पन्न - बचत = खर्च ✔️ #आर्थिकसाक्षरता
23
212
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
पंजाबी थाळी, दक्षिण भारतीय थाळी, गुजराती थाळी तशी महाराष्ट्रीयन शाकाहारी थाळीची साखळी हॉटेल्स तयार व्हायला हवीत….. चहा, मिसळ, वडापाव, अल्पोपहार याच्या पुढेही मराठी खाद्यसंस्कृती जायला हवी!
57
145
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
ट्विटरचा खरा वापर सूरू झाला लॉकडाऊनमधे. बऱ्याच ज्ञात-अज्ञात मंडळींच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने तो निळ्या टिकच्या जबाबदारीपर्यंत आलाय. इथे सुरूवातीला ओळखपाळख नसतानाही अमर्याद प्रेम, माया, विश्वास, आपुलकी, मिळाली. या उपकाराची जाणीव व कृतज्ञता कायम असेल. सर्वांचे खूप धन्यवाद 🙏
Tweet media one
205
39
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
गाड्यांसाठी, सुट्टीत फिरायला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी, तसेच कर्मकांडांसाठी जेवढे कमीत कमी कर्ज घेता येईल ते चांगले…. कारण अशा पद्धतीची कर्ज तूम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतात. #आर्थिकसाक्षरता
24
144
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
तीन महत्वाचे फायनान्शियल गोल्स - १. वर्षभरात बचत किती करणार? २. गुंतवणुक कुठे अन कशी करणार? ३. उत्पन्न आणि बचत याचे प्रमाण कसे वाढवणार? याशिवाय शिक्षण, मेडीक्लेम, इमरजंन्सी फंड, सणसुद, इतर खरेदी, टूर्स आणि हॉटेल्स या खर्चाचेही याचेही योग्य प्रमाणात नियोजन हवे. #आर्थिकसाक्षरता
24
242
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
कॉर्पोरेट करियरमधे कधीही कोणा “एकाचा माणूस” होऊ नये, आपण फक्त “कामाचा माणूस” व्हायचा प्रयत्न करायचा. याचा सुरुवातीला त्रास होतो पण लॉंगटर्ममधे करियर १००% फुलते, बहरते.
29
143
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
गरीबांचे प्रश्नच मुळी वेगळे असतात…गरीबी फक्त वापरून घेतली जाते, नाडली जाते. ती दूर करण्यात कोणालाही काडीचाही इंटरेस्ट नसतो! यातून एकावेळी सर्व बाहेर पडूच शकणार नाहीत…विमानातल्या सुचनेसारखं- प्रथम स्वतः ऑक्सिजन मास्क लावा मग इतरांना मदत करा! कोणी काहीही म्हणो- पहिले पैसा कमवा!
36
236
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
मला बऱ्याचदा वाटतं महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातून आपले तरूण एकदा तरी मुंबईत यायला हवेत. स्किल्ड, सेमिस्किल्ड आणि अगदी कोणताही अनुभव नसला तरी चालेल. इथे सुरूवातीला थोडा स्ट्रगल होईल पण जे टिकतील त्यांच नक्की भलं होईल. सरकारने यासाठी काहीतरी योजनाबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा.
66
167
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
गावातून मुंबईत आल्यावर शिकलेलं महत्वाचं सुत्र - “आपलं काम” हीच इथे आपली पहिली अन शेवटची ओळख आहे, ती कधीच विसरायची नाही. #आमचीमुंबई ❣️
8
140
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
कधीतरी, कुठेतरी थांबायला हवे….. थोडीशी विश्रांती गरजेची असते. हीच ती वेळ! सर्वांचे धन्यवाद 🙏
66
36
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
ट्विटरकडे जगभरात मिळून फक्त सहा हजाराच्या आसपास कर्मचारी आहेत तर फेसबुककडे एकसष्ट हजार. आणि एकट्या टाटा सन्स कडे आठ लाख कर्मचारी काम करतात…!! भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशात रोजगारनिर्मीती ही पहिली गरज आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वाढायला हवी.
31
149
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
कोणी नॉनव्हेज खातेय म्हणून घर नाकारणे हे अत्यंत अपमानास्पद अन चूकीचे आहे. महाराष्ट्राची भूमी ही सर्वसमावेशक आहे ती तशीच रहायला हवी! #मुंबई
65
119
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
कोणतेही लोन पुर्ण भरून झाले तरी त्या हप्यांएवढी रक्कम (EMI) पुढचे काही महिने तशीच एका वेगळ्या बॅंक अकाऊंटमधे टाकत त्याची “बचत” करायची. जमा झालेली रक्कम मुलांच्या भविष्यासाठी किंवा इतर योग्य कामी “गुंतवणुक” करावी. एक वेगळी आठवण तर राहतेच आणि चांगली सवयही लागते. #आर्थिकसाक्षरता
32
147
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
मुंबई-पुणे रस्त्यावर कोणत्याही फुडमॅालला तीन प्रकारची लोकं दिसतात, १. पोटाची भूक भागविण्यासाठी कमीतकमी किंमतीतले पदार्थ शोधत असतात. २. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी धावाधाव करणारी मंडळी. ३. घरून पिशवीत बांधून आणलेला डबा मनापासून खाणारे लोकं. ३ नंबरचे लोक मला जास्त भावतात.
28
94
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
बचत वाढविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:च्या गरजांचे कायम ऑडीट करत रहायचे. जे गरजेचे ते चालू ठेवायचे, इतर शॉऑफच्या फॅन्सी, लक्झरी गोष्टी बंद करायच्या... #आर्थिकसाक्षरता
25
141
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 months
खूप दिवसांनी मराठी भाषेत मेंदूबद्दल पर्यायाने मानवी बुद्धीसंबंधी इतका चांगला आणि सुटसुटीत व्हिडीओ पाहिला. अगदी वेळ काढून सहकुटूंब नक्की पहावा असा तो आहे, धन्यवाद @bbcnewsmarathi @SidhGanu 🙏
18
494
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
हाताला लागेल ते किंवा कोणीतरी वाचतो म्हणून वाचण्यापेक्षा- 🔹एखाद्या विषयावर ज्ञान मिळवण्यासाठी 🔹मन शांत होण्यासाठी 🔹स्वतःच्या चूका समजून योग्य मार्ग शोधण्यासाठी 🔹आयुष्यात प्रगती करण्यासाठी 🔹माणसं वाचायला शिकण्यासाठी आधी योग्य पुस्तकं वाचायला हवीत,आयुष्य खूप सोपे होऊन जाते!
24
204
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
रोज स्वत:ला चॅलेंज करा - आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधीत कमीतकमी १० नवीन शब्दांचा शोध घ्यायचा. त्यांचा नीट अर्थ समजून घ्या. आपल्या विषयात ‘नैपुण्य’ मिळविण्याच्या दृष्टीने टाकलेले ते पहिले पाऊल असते. हेच ‘ज्ञान’ आपले ‘भविष्य’ घडवते.
15
199
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
या वर्षात प्रगती करायची असेल तर प्रथम या गोष्टी करा! १. मोबाईलचा अतिरेक टाळा! २. टिव्ही, डिजीटल समाजमाध्यम,बातम्या, राजकारण, क्रिकेट कमी करा! ३. अवांतर वाचनाऐवजी आपल्या कामाशी निगडीत माहीतीपुर्ण वाचन वाढवा. ४.आरोग्य आणि मानसिक स्वास्थ जपा. ५.मित्र निवडताना काळजी घ्या.
39
277
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
#MPSC परिक्षेतून (फक्त) सिलेक्ट झालेल्या मुलांची अवस्था हल्��ी पहावत नाही….. समाजमाध्यमातील त्यांचा वावर आणि भावना अस्वस्थ करतात. सरकारमधील एकाही संवेदनशील आमदार,खासदाराला हे कळू नये हे दुर्दैव आहे. तेही सोडा त्यांच्यासारखेच गरीबीतून वर आलेले अधिकारीही मूग गिळून गप्प बसताहेत.🤦‍♂️
49
280
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
माफ करता यायला हवं आणि विषय सहज सोडून द्यायला (डिटॅच करायला) जमायला हवा….. मानवी स्वभावाच्या थोडं विरूद्ध आहे, पण चांगल्या हेतूने पुढे जाताना काही गोष्टी अशा मागे सोडून दिलेल्या बऱ्या. इगो अन रिव्हेंज हे आपल्या उमेदीच्या काळातील सर्वात मोठे शत्रू आहेत.
29
287
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
मुद्दा काय? आंदोलन काय? करतोय कोण? का? कशासाठी? कशाला कशाचा मेळ नाही! सोशल मिडीयाने पार सगळं पोखरलंय आणि ही असली पोरं आपल्या देशाचं भविष्य 🤦‍♂️ त्यांचे शिक्षक आणि आईवडील नक्की काय विचार करत असतील?
56
146
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
महिन्याला ५/१० हजार पगार असेल तेंव्हा बचत किंवा गुंतवणूक वगैरे आवाक्याबाहेर होत्या, आर्थिक चणचण प्रचंड जाणवायची? आता महिन्याला हजारो-लाखो रूपये मिळवूनही ताणतणाव,तशीच पैशांची चणचण जाणवत असेल तर यालाच आर्थिक निरक्षरता म्हणतात. #आर्थिकसाक्षरता म्हणजे फक्त जास्त पैसे कमविणे नव्हे.
19
152
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
▪️जर एखाद्यास प्रवासाचा कंटाळा येत असेल, ▪️एखाद्या ठिकाणी अपमान होईल याची भीती/लाज वाटत असेल ▪️काम/हक्काचे पैसे मागायला संकोच वाटत असेल, ▪️बौद्धिक/शारिरिक कष्ट,ताण याचा त्रास होत असेल ▪️अभ्यास,स्पर्धा,नवे तंत्रज्ञान याचा कंटाळा येत असेल, तर अशांनी अजिबात उद्योग-व्यवसाय करू नये!
20
254
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
5 months
मी तीन गोष्टींची पूजा करतो. ज्ञान, नम्रता आणि नैतिकता. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
Tweet media one
14
238
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
स्वत:शी खोटं बोलणं थांबवलं की आपली खरी प्रगती सूरू होते.
19
142
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
पैसे कमवायला लागल्यावर कुटूंबाची जबाबदारी, कधी कर्जफेड, गुंतवणुक, गाडी, घर, तर काही लोक वाईट व्यसनाच्या आहारी जातात. प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धी, संस्कार व उत्पन्नाप्रमाणे वागतो. हे सर्व करत असताना पैशांचा काही वाटा स्वतःचे छंद, आनंद, पर्यटन व आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापरावा!
16
175
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
दर सोमवारी सकाळी सकाळी कमीतकमी तासभर तरी आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या विषयासंदर्भातील महत्वाची साप्ताहिकं, मासिकं, जर्नल्स चाळायची, वाचायची. त्यातील महत्त्वाच्या घटना, शोध व तंत्रज्ञान याच्या नोट्स काढून आठवडाभरात वेळ मिळेल तसा त्यावर अभ्यास करायचा! कामात नवी उर्जा मिळते.
14
190
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
लहानपणी परिक्षेचे मार्क पाहून जे ठराविक लोक मनाविरूद्ध अभिनंदन करायचे, बळेच फाटलेला खिसा पाहून खिजवण्यासाठी पेढे मागायचे…त्यांना आजही आपला तोच फाटका खिसा हवा असतो…..तो तसा दिसला नाही की ते द्वेष आणि मत्सराच्या आगीत भस्म होतात पण सुधारत नाहीत! हा पण आपलाच समाज, तो बदलायला हवा!
38
177
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
कोल्हापुर आर्थिकदृष्टया संपन्न आहेच पण वैचारिक तसेच बौद्धिकदृष्ट्याही प्रगल्भ आणि अधिक श्रीमंत आहे. #शाहूवंदन हा कार्यक्रम मनापासून भावलाच शिवाय कोल्हापूरकरांबद्दल आधीपासून असलेला आदर, प्रेम द्विगुणित झाले! ✊❣️ #शाहूस्मृतीशताब्दी 🙌🙏
29
152
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
वेळ काढा, वाचा. पुस्तकं वाचा, लेख वाचा. ऑडीयोबुक्स, पॉडकास्ट ऐका. शक्य असेल ते माध्यम वापरा पण विविध विषय समजून घ्या. त्यातून आवड निर्माण झाली की एक नवं जग गवसेल ते आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. स्पेशली, करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असणाऱ्यांना चांगली दिशा मिळेल.
16
234
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
एखाद्याचं उद्योगधंद्यात नुकसान झालं तर जेवढा आनंद त्याच्या भावकीला, पै पाव्हण्यांना, ओळखीपाळखीच्यांना होतो तेवढा तर त्या माणसाच्या व्यवसायतल्या स्पर्धकाला किंवा शत्रूलाही होत नसावा….. “तो बुडाला” हे सांगताना काहींना इतक्या उकळ्या फुटतात जणू काय सांगू अन काय नको 🤦‍♂️ विकृती 🤦‍♂️
53
178
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी टिव्हीवरील बातम्या पाहण्यापेक्षा काही स्थानिक अन विदेशातील वर्तमानपत्र वाचणे हा उत्तम पर्याय आहे!
26
91
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
इलेक्ट्रिक गाड्यांमुळे “प्रदुषण” होत नाही….. हे छातीठोक सांगणारा मुलगा इंजिनियर असतो याहून आपल्या इथल्या शिक्षणाचं मोठं दुर्दैव ते काय? 🤦‍♂️🧐🤦‍♂️
77
112
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
जग जिंकतां येऊ शकतं! हा आत्मविश्वास या मातीला मिळाला, तो रूजला तो दिवस! #शिवराज्याभिषेक ✊
10
218
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आयुष्यभर ज्यांना आदर्श म्हणून मिरवावं वाटतं असे छत्रपती शाहू महाराज 🙏 १०० सेकंद कृतज्ञतेचे… ६ मे,‌ २०२२ रोजी, सकाळी १०ः०० वाजता. बरं ही कृतज्ञता म्हणजे काही उपकाराची परतफेडही नाही, खर तर ही स्वतःला जागं ठेवण्याची धडपड आहे. #शाहूवंदन मी करणार! ✊🙏
27
408
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
अपमान पचवून पुन्हा उभं रहायला खर नैतिक धैर्य लागतं…..आपल्या मराठी कुटूंबामधे अशी नैतिकता ठासून भरलेली असते पण आपल्यात “अपमान” फार वेळ डोक्यात घेऊन जगण्याचा वाईट गुण आहे. कोणती गोष्ट किती वेळ ताणून धरायची याची मर्यादा कळली की ध्येय साधणं सोपं जातं!
22
174
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
टाटा आणि महिंद्र यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात जणू कात टाकलीये. अमुलाग्र बदल झालाय. त्यांच्या गाड्यांच्या डिझाईन्स, तंत्रज्ञान, फिचर्स व किंमतीचा “भारतीय मेळ” नक्कीच सुखावणारा आहे. दोन्ही ठिकाणी आपल्या मातीतले बरेच तंत्रज्ञ, इंजिनियर्स महत्वाची भूमिका निभावतात. सर्वार्थाने अभिमान!
25
87
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
इथला फक्त जातीचा माज या देशाचं तालिबान करण्यासाठी पुरेसा आहे….. धर्म, प्रांत वगैरे कॅटलिस्ट !
25
161
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
कर्तृत्व असावं तर माझ्या राजांसारखं… ३५० वर्षांनंतरही मान ताठ ठेवायला शिकवणारं 💪 #शिवस्वराज्यदिन #शिवराज्याभिषेक
14
166
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
आपल्या जन्माच्या वेळेस घरची आर्थिक परिस्थिती कशीही असो- ती कमी होणार,तशीच राहणार की वाढणार? हे आपल्या वैचारिक भरणपोषणावर अवलंबून असते. वैचारिक समृद्धीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या- १-वाचन २-आजूबाजूच्या माणसांची संगत. ३-ठोस कृती. ४-सतत नव्या गोष्टी शिकण्याची आस. #आर्थिकसाक्षरता
24
271
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
ज्ञान प्राप्तीसाठी हजारो मार्ग आहेत.…. अक्कल मात्र आपल्याला फक्त मित्रांमध्ये राहुनच मिळते!
16
105
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
कितीही पैसे खर्च केले तरी विश्वास, माणूसकी आणि सद्सदविवेकबुद्घी विकत घेता येत नाही….. ती कमवावीच लागते!
19
148
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
दिपस्तंभ ✊🙏 राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा! #शाहूवंदन
Tweet media one
14
124
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
आपल्याला बऱ्याचदा वाटते की अचानक भरपूर पैसे मिळावे आणि मग आपण आयु���्यभर सुखी, समाधानी होऊ तर ते पुर्णपणे चूक आहे. संपुर्ण आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर ज्ञान, अनुभव आणि सतत कष्ट करण्याची क्षमता याला पर्याय नाही. #गोष्टपैशापाण्याची #आर्थिकसाक्षरता #अवतरण
Tweet media one
75
285
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
हिरवाई निवांत क्षणभर 🍃☘️🌿🌱🌳
Tweet media one
30
12
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
3 years
शेअर मार्केट म्हणजे “Easy Money” हा फार मोठा गैरसमज लोकांमधे आहे. हे काही जुगार,मटका वा लॉटरीचे तिकीट नव्हे. प्रचंड अभ्यास, संयम, दूरदर्शी विचार, वाट पाहण्याची आर्थिक ताकद/कुवत असेल तरच यात या. झटपट श्रीमंती अन लोभापायी आलात तर तुमची १००% शिकार होणार हे नक्की! #आर्थिकसाक्षरता
36
148
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
लहान भावाचं शिक्षण व्हावं म्हणून मोठा भाऊ शिक्षण सोडून रोजगाराला लागतो…राब राब राबतो. काबाडकष्ट तसा फार लहान शब्द असतो अशा बाप माणसांसाठी,स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करतो, लहाना पुढे साहेब बनतो. मग तो दाद्याला वाऱ्या-पावसात सोडून स्वतःच्या बायकापोरांसह भूर्र उडून जातो…😞
44
121
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
अपयशाने खचून जावू नये वगैरे वगैरे भाषणातून बोलायला ठिक असते. जेंव्हा ती वेळ आलेली असते तेंव्हाची परिस्थिती फार भयंकर असते! प्रयत्नच केलेले नसतील तर फार फरक पडत नाही पण कष्ट करूनही पदरी निराशा येते ते पचविणे व त्यातून उठणे मात्र नक्कीच अवघड असते. अनुभवाने व वाचनाने ते सोपे होते.
25
192
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
स्वतःची ओळख तयार झाल्यावर जग आपल्या मागे येतं पण आपण कोणीच नसताना - नाव,गाव,पैसे,घरदार,वर्तमान,भविष्य कशाचाही पत्ता नसताना - अगदी सर्वसामान्य व आव्हानात्मक अवस्थेत आपल्यावर विश्वास ठेवणारी, सोबत ठाम उभं रहात असलेली माणसं म्हणजे कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान, अमुल्य दौलत!❣️
19
242
2K
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आपली मुलं योग्य मार्गाने पैसे कमवायला लागल्यावर सर्वाधिक आनंद आईवडिलांच्या चेहऱ्यावर असतो. त्यातही कायम आर्थिक ओढाताण असलेल्या कुटूंबात हे सुख म्हणजे सोहळा असतो….. आर्थिक स्वातंत्र्य हीच प्रत्येक तरूण-तरूणींची उमेदीच्या काळातली प्रायोरिटी हवी.
11
143
2K